घरCORONA UPDATEकोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार

Subscribe

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे पगार दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत ९५ हजार ७३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १६ लाख ३ हजार ८९६ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. मात्र, असे असताना देखील आपला जीव धोक्यात घालून वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे पगार दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या राज्याचा मोठा निर्णय

हरयाणा सरकारने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हरयाणातल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत दुप्पट पगार मिळणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गुरुवारी इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरु, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

यांना मिळणार दुप्पट पगार

मुख्यमंत्री खट्टर यांनी आरोग्य मंत्री अनिल विज आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वैद्यकीय आणि त्या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कामगार, रुग्णवाहिका चालकांना दुप्पट वेतन मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: आंध्र प्रदेशमध्ये अडकलेल्या मुलासाठी आईने दोन दिवस चालवली दुचाकी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -