घरदेश-विदेशCorona: जूनमध्ये CRPFच्या १८ जवानांचा मृत्यू; आतापर्यंत २७ बळी!

Corona: जूनमध्ये CRPFच्या १८ जवानांचा मृत्यू; आतापर्यंत २७ बळी!

Subscribe

निमलष्करी दलांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाचा कहर देशभरात सुरू असून पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह आता निमलष्करी दलातील जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच धक्कादायक माहिती समोर येत असून निमलष्करी दलांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आतापर्यंत २७ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी १८ जवानांचा मृत्यू केवळ जून महिन्यात झाला. दरम्यान, कोरोना संक्रमित कर्मचार्‍यांची संख्या ४ हजार ८०० च्या वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सीआरपीएफच्या ९ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी ७ जवानांचा जूनमध्ये मृत्यू झाला आहे. रविवार पर्यंत सीआरपीएफमध्ये एकूण १ हजार ५१० कोरोना रुग्णांची नोंद होती, त्यापैकी ७५५ अॅक्टिव्ह केसेस होते. तर सीआयएसएफमध्ये ८ जवानांचा मृत्यू झाला, त्यापैकी गेल्या महिन्यात ४ सैनिक मरण पावले. सीआरपीएफमध्ये आतापर्यंत एकूण १ हजार २१ कोरोना बाधित आढळले आहेत.

त्यापैकी ३८ टक्के रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच बीएसएफमध्ये १ हजार ३०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात तिघांचा मृत्यू झाला. आयटीबीपीमध्ये ४२५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एसएसबीमध्ये १५३ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशात ७ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली असून ७ लाख १९ हजार ६६५ लोकं कोरोना बाधित आहेत. तर मृतांची संख्या २० हजार १६० वर पोहोचली आहे. तसेच कोरोनाविरूद्धच्या लढाईत आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ९४८ लोकांनी कोरोनावर हरवलं आहे.


भारताच्या ‘या’ राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -