घरदेश-विदेशCoronaVirus: मध्य प्रदेशात तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावरच दगडफेक

CoronaVirus: मध्य प्रदेशात तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावरच दगडफेक

Subscribe

पोलिसांचे बॅरिकेट तोडून वैद्यकीय पथकावर गावकऱ्यांनी केली दगडफेक

देशासह प्रत्येक राज्यात कोरोनाने आपले हात पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३३५ तर मध्यप्रदेशमध्ये ७० हून अधिक कोरोना रूग्णांची आकडेवारी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये साधारण १२ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाग्रस्तांचा मध्य प्रदेशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना मध्यप्रदेशातील इंदौरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या भागात बुधवारी तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

असा घडला प्रकार

इंदौरमध्ये गावकऱ्यांच्या तपासणीसाठी बुधवारी दुपारच्या वेळात हे वैद्यकीय पथक बखल इथे दाखल झाले होते. मात्र या पथकाचा निषेध करत काही अतरंगी गावकऱ्यांनी निषेध करताना पोलिसांचे बॅरिकेट तोडून पथकावर दगडफेक केली. हा प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच प्रकरण शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. गावकरी आणि वैद्यकीय पथकातील काही लोकांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. यावेळी गावकऱ्यांनी पथकावर दगड फेक करत हल्लाबोल केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत राणीपुरा भागात वैद्यकीय पथकाशी उद्धटपणे वर्तन करत त्यांच्या अंगावर थुंकल्याचा प्रकारही समोर आला होता. मात्र मध्यप्रदेशात रूग्णांची संख्या वाढत असताना देखील पुन्हा एकदा गावकऱ्यांनी वैद्यकीय पथकाशी गैर वर्तवणूक केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.


इटली: जादूचं पाणी असणाऱ्या ‘या’ गावात कोरोनाची एण्ट्री झालीच नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -