घरCORONA UPDATECoronaVirus - दिल्ली हादरली! निजामुद्दीन परिसरातील २०० लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं

CoronaVirus – दिल्ली हादरली! निजामुद्दीन परिसरातील २०० लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं

Subscribe

करोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या संपूर्ण परिसरावर पोलिसांकडून ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. येथील नागरिकांना बसेसमध्ये भरून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात येत आहे.

काल रात्रीपासून दिल्ली हादरली आहे. कारण दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील २०० लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. या रूग्णांना दिल्लीतील वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षेखातर दिल्ली पोलिसांनी सर्व परिसर सीला केला आहे.

१८ मार्चला निजामुद्दीन येथील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घरी परतले आहेत. ज्या २०० लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ते सर्वजण या मशिदीच्या आसपास राहणारे होते. यातील ३४ जाणांना रविवारी तर सोमवारी १५० लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

- Advertisement -

लॉकडाऊनदरम्यान निजामुद्दीनमध्ये एका धार्मिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात किमान २०० जण सहभागी झाले होते. ये सर्वजण बांगलादेश, श्रीलंका या देशांतील असल्याचं सांगण्यात येतंय. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन वृद्धांचा चार दिवसांत संशयितरित्या मृत्यू झाला आहे. पण त्यांना करोनाची लागण झाली होती की नाही? हे स्पष्ट होऊ शकलं नाही. पण या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २०० जणांना सर्दी-खोकला झाल्याचं समोर आलंय.

याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रीनगरमधील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पोलिसांनी मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच गेल्या एका आठवड्यापासून परिसरात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. करोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या संपूर्ण परिसरावर पोलिसांकडून ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. येथील नागरिकांना बसेसमध्ये भरून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -