परदेशातून आलेल्या गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला, बाळाचा गर्भात मृत्यू!

उपचारा आभावी गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा गर्भात मृत्यू झाला

Mumbai
pregnant indian woman in uae files petition in supreme court of india seeks repatriation report
गर्भवती महिला

कोरोनादरम्यान तुम्ही अनेक माणुसकीच्या घटना पाहिल्या असतील, परंतु काही लोक या संकटाच्या काळातही त्यांच्या कृतीतून कठोर होताना दिसताय. अशीच एक घटना मंगलोरमध्ये समोर आली आहे. वंदे भारत उड्डाणातून परतलेल्या गरोदर महिलेला तिच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही त्यानंतर तिला खासगी रुग्णालयातही प्रवेश नाकारण्यात आला. या महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला.

वंदे भारत मिशन अंतर्गत गर्भवती महिला देशात परतल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान, त्याची कोरोना टेस्टही झाली, जी निगेटिव्ह आली. यानंतर, ती मंगलोरमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा अपार्टमेंट असोसिएशनने प्रवेश देण्यास नकार दिला.

राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर ही महिला एका खासगी रुग्णालयात तिच्या उपचारासाठी दाखल झाली, परंतु परदेशातून परत आल्याची बातमी समजताच या देखील रुग्णालयाने त्या महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. या अमानुषतेचा फटका त्या महिलेला खाजगी रुग्णालयात सहन करावा लागला आणि यादरम्यान तिच्या पोटातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला.

आता या प्रकरणात, मंगलोर महानगरपालिका आयुक्तांनी अपार्टमेंट असोसिएशनला नोटीस बजावून जाब विचारेल की, तुम्ही या महिलेला तिच्या घरात प्रवेश देण्यास नकार का दिला? तसेच, आयुक्तांनी आदेश दिले की कोणीही महिलेला तिच्या घरी जाण्यापासून तिला रोखू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.


‘मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, मुलं आणि गर्भवती महिलांनी रेल्वेने प्रवास करु नये’