घरदेश-विदेशकोरोनाबाधित हजार रूग्णांपैकी ६ रूग्णांचा होतोय मृत्यू- WHO

कोरोनाबाधित हजार रूग्णांपैकी ६ रूग्णांचा होतोय मृत्यू- WHO

Subscribe

प्रत्येक १६७ पैकी एक व्यक्ती कोरोनामुळे आपला जीव गमावतो

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख महामारी विशेषज्ज्ञ यांनी सांगितले की, कोरोना बाधित होणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूदर हा ०.६ टक्के आहे. महामारी विशेषज्ज्ञ डॉ. मारिया वॅन केरखोव (Maria Van Kerkhove) यांनी सांगितले की, हे मूल्यांकन काही अभ्यासांमध्ये केले गेले आहे. जरी हा मृत्यूदर फारसा दिसत नसला तरी तो खूप जास्त आहे. कारण प्रत्येक १६७ पैकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये महामारीच्या प्रादुर्भावाने कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगात ६.९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हे मृत्यू दराचे नवीन मूल्यांकन देखील असे दर्शविते की, जगात आतापर्यंत ११. ५ कोटी लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. सध्याच्या नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपेक्षा हे ७ पट जास्त आहे.

- Advertisement -

असे मानले जाते की, जगात कोट्यावधी लोक आहेत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे परंतु त्यांची तपासणी झालेली नाही. विशेषत: साथीच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच देशांमध्ये चाचण्या करण्याची क्षमता कमी होती. डब्ल्यूएचओची आघाडी डॉ. मारिया यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा मृत्यू दर शोधण्यासाठी वैज्ञानिकांची अनेक पथके कार्यरत आहेत. मारिया यांनी असेही म्हटले आहे की, या क्षणी किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला हे सांगता येणार नाही. ते म्हणाले की, काही अभ्यासांमध्ये संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ०.६ टक्के आहे.

तर पूर्वी काही मूल्यांकनांमध्ये, संक्रमित लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.८ टक्के होते. त्याचबरोबर केंब्रिज विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांचा असा विश्वास आहे की हा दरही १.४ टक्के देखील असू शकतो.


WHO चा इशारा! कोरोनावर रामबाण औषध कदाचित मिळणारच नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -