घरCORONA UPDATEकोरोनातून बरे झालेल्यांनो सावधान! गाफिल राहू नका, पुन्हा होताय कोरोना

कोरोनातून बरे झालेल्यांनो सावधान! गाफिल राहू नका, पुन्हा होताय कोरोना

Subscribe

एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या शरिरात कोरोना विषाणूविरोधात लढणारी अँटीबॉडिज तयार होते. ज्यामुळे पुन्हा असा विषाणू शरिरात आल्यानंतर त्याचा मुकाबला करता येतो. मात्र हाँगकाँगनंतर आता भारतातही कोरोनामुक्त झालेले रुग्ण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळत आहेत. मुंबई आणि दिल्लीतून अशी उदाहरणे समोर आली आहेत. दिल्ली येथे दोन दोन तर मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा पुन्हा संसर्घ झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीमधील इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉडी या संस्थेने केलेल्या संशोधनातून हा खुलासा समोर आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिलेले आहे. दिल्ली येथील आयजीआयबी या संस्थेचे संचालक डॉ. अनुराग अग्रवलाल यांनी सांगितले की, आम्ही देशभरातून १६ आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी दिल्लीतील दोघे तर मुंबईतील चार जणांना पुन्हा एकदा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. पहिल्यांदाच भारतात अशा प्रकारचे प्रकरण समोर आले. मुंबईत नायर रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना तर हिंदुजा रुग्णालयातील एकाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नोएडाताली २५ वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी आणि २८ वर्षीय महिलेच्या चाचणीत SARS-CoV2 विषाणूच्या दरम्यान ९ भिन्नता आढळून आल्या आहेत. HCW तर्फे घेण्यात आलेल्या PCR चाचणीत हे दोन कर्मचारी अनुक्रमे ५ आणि ७ मे रोजी पहिल्यांदा तर २१ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळले होते. हे दोन्ही आरोग्य सेवा कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात आल्याचे नोएडातील ‘गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे प्रमुख डॉ. राकेश गुप्ता यांनी सांगितले.

नांदेडचे खासदारही दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

नांदडे लोकसभेचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १७ खासदार पॉझिटिव्ह आढळले. चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

कोरोनातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे आवश्यक

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ५० लाखांच्या पुढे गेला आहे. तर ३९ लाख ४० हजार रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहे. मात्र आता त्यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा संसर्ग होत नाही, असा एक समज होता. मात्र काही उदाहरणावरुन हा समज खोटा ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -