देशात कोरोना फैलाव नियंत्रणात; परंतु थंडीत दुसरी लाट येण्याची शक्यता!

देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाखाच्या घरात

Single day spike of 57,117 positive cases & 764 deaths in India in the last 24 hours

देशात कोरोनाचा कहर आटोक्यात आला आहे. सरकारने रविवारी याची अधिकृत घोषणा केली असून तसेच थंडीमध्ये अधिक काळजी घेण्याची सूचना देखील केली. १७ सप्टेंबर रोजी देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या १०.१७ लाख होती. त्यानंतर सातत्याने घट होत असून ती ७.८३ लाखांवर पोहोचली आहे. नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांत देशातील बर्‍याच राज्यात कोरोनाची प्रकरणे आणि साथीच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु थंडीमुळे कोरोनाची दुसरी लाट नाकारता येत नाही. पॉल देशातील साथीच्या आजाराशी संबंधित कमिटीचे प्रमुख असून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पॉल म्हणाले की बहुतेक राज्यांमध्ये साथीचा रोग नियंत्रणात आला आहे, परंतु पाच राज्यात (राजस्थान, छत्तीसगढ, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल) मध्ये आणि ३-४ केंद्रशासित प्रदेशांत अजूनही बाधितांची संख्या वाढत आहेत. पॉल यांनी असेही म्हटले आहे की, जगातील इतर देशांपेक्षा भारत अजूनही उत्तम स्थितीत आहे, परंतु त्या देशाला अजून बरीच टप्पा गाठायचा आहे. कारण ९०% लोक अद्याप कोरोनाव्हायरस संक्रमणास बळी पडत आहेत.

शनिवारी देशात ६१ हजार ८९३ रुग्ण आढळले, तर ७२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले. तर देशात एकूण बाधितांची संख्या ७४.९२ लाख झाली असून ती आज ७५ लाखांच्या पुढे जाईल. आतापर्यंत ६५.९४ लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर १.१४ लाख लोकांचा बळी गेला आहे. शनिवारी १०३१ कोरोना संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. २ ऑक्टोबरनंतर प्रथमच मृतांचा आकडा हजाराच्या वर गेला असल्याचे सांगण्यात आले होते.


देशात फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ येणार आटोक्यात; शास्त्रज्ञांचा दावा