घरCORONA UPDATEभारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू

Subscribe

भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा १९ वर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात देशभरात ९५ रुग्ण वाढले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

जगात थैमान घालणाऱ्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. तसेच या करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, याकरता केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन केला आहे. दरम्यान, ANI ने दिलेल्या वृत्तीनुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा १९ वर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात देशभरात ९५ रुग्ण वाढले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले असून २४ तासात १४९ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली आहे.

- Advertisement -

इटलीत करोनाचा कहर

जगाचा विचार केला तर करोनाने इटलीला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटलीमध्ये दिवसरात्र केवळ अँबुलन्सचा आवाज येत आहे. कोरोना विषाणूचे केंद्र बनलेल्या इटलीमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इटलीमध्ये करोना विषाणुमुळे शुक्रवारी तब्बल ९१९ जणांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात झालेल्या संक्रमणामुळे ९ हजार १३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपामधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारखे देश देखील करोनाच्या विळख्यात आहेत. संपूर्ण युरोपमध्ये करोना विषाणूची ३ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. एकट्या इटलीबद्दल बोलायचे झाले तर येथे करोना विषाणूचे ८६ हजाराहून अधिक रुग्ण आहेत.

जगभरात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे अमेरिकेत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनूसार अमेरिकेत करोनाचे १ लाख ४ हजार १४२ रुग्ण असून १ हजार ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ हजार ५२२ जण बरे झाले आहेत. अमेरिकामध्ये शुक्रवारी १८ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर ४०० जणांचा शुक्रवारी मृत्यूही झाला. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक ४६ हजार २६२ रुग्ण आढळले आहेत. तर ६०६ जणांचा मृ्त्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखी तीन आठवडे करोनाचे रुग्ण वाढणार असल्याची शक्यता न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: Live update – भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, तर १९ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -