घरCORONA UPDATEभारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५८ टक्के - केंद्रीय आरोग्यमंत्री

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५८ टक्के – केंद्रीय आरोग्यमंत्री

Subscribe

देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर ३ टक्के

भारतात कोरोना रुग्ण वाढत असले तरी भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झालं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. शिवाय, आतापर्यंत तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जो खूप कमी आहे असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं. भारतात सध्या १ लाख ९७ हजार ९५३ कोरोना रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत.

दरम्यान, भारतात रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण १९ दिवसांवर पोहचलं आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होतं अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक १८ हजार ५५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३वर पोहोचला आहे. तर यापैकी १५ हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १ लाख ९७ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू काश्मीर: तीन दशकांत पहिल्यांदाच त्रालमध्ये दहशतवाद्यांचा सुपडा साफ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -