घरCORONA UPDATECoronaVirus: भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६० टक्क्यांहून अधिक

CoronaVirus: भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६० टक्क्यांहून अधिक

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी आहे. देशात एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६० टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६०.७३ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख २५ हजाराच्या पुढे गेली आहे. चांगली गोष्ट म्हणजे यापैकी ३ लाख ७९ हजार लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात २ लाख २७ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये कोरोना विषाणूचे सर्वाधिक २० हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ वर पोहोचला आहे. यापैकी २ लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर एकूण ३ लाख ७९ हजार ८९२ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. देशातील एकूण मृत्यूची संख्या १८ हजार २१३ झाली आहे.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -