घरदेश-विदेशआसाममध्ये कोरोनाविरूद्ध Serological सर्वे सुरू; अँटी बॉडीज मिळण्याची शक्यता

आसाममध्ये कोरोनाविरूद्ध Serological सर्वे सुरू; अँटी बॉडीज मिळण्याची शक्यता

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून त्याविरूद्ध लढण्यासाठी सर्वच देश प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती कशी विकसित होते हे शोधण्यासाठी रविवारी पहिले सीरो सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यावेळी कुटुंब आणि कल्याण राज्यमंत्री पियुष हजारिका म्हणाले की, “आज सीरोचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. यामुळे व्हायरसविरूद्ध अँटी बॉडीज असलेल्या लोकांना ओळखण्यात मदत होईल.”

श्रीजानसोम या स्वयंसेवी संस्थेच्या विश्वस्त मृदुस्मिता दास यांनी सांगितले की, “हा अभ्यास कोरोना विषाणूचा संसर्ग ओळखण्यास नक्की मदत करेल . सध्याच्या चाचणीच्या धोरणा अंतर्गत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे आसाममधील लोकांमध्ये संक्रमणाविरूद्धची प्रतिकारशक्ती किती आहे हे स्पष्ट होईल. या सर्वेक्षणातून कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या लोकांमध्ये प्लाझ्मा देणगीची गरज जागरूकता निर्माण होईल.” या संदर्भात, गुवाहाटीचे मेडिसीटी ग्रुप ऑफ क्लिनिक्स अँड डायग्नोस्टिक्स नमुना संकलन आणि प्रयोगशाळेच्या चाचणीमध्ये मदत करीत आहेत.

- Advertisement -

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. आसामच्या डाउनटाउन युनिव्हर्सिटीने प्रस्तावित संशोधनास मान्यता दिली आहे. आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली यांच्या देखरेखीखाली या सर्वेक्षणांचा अभ्यास केला जाणार असून राष्ट्रीय आरोग्य अभियान आसामने सर्व उपायुक्तांना सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

सीरोलॉजिकल टेस्ट म्हणजे ही एक प्रकारे रक्त चाचणी असते जी एखाद्या व्यक्तीच्या रक्तात उपस्थित अँटी बॉडीज ओळखते. जर रक्तातील लाल रक्त पेशी रक्तामधून काढून टाकली तर पिवळा पदार्थ शिल्लक राहतो त्याला सीरम म्हणतात. या चाचणीत त्याची पाहणी केली जाते.


Corona Update: मुंबईत २४ तासांत ९९१ नव्या रुग्णांची वाढ, ३४ जणांचा मृत्यू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -