घरताज्या घडामोडीभारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण; १३२ जणांचा मृत्यू

भारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण; १३२ जणांचा मृत्यू

Subscribe

भारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर १३२ जणांचा मृत्यू मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तर मागील २४ तासांत देशात तब्बल ५ हजार ६०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

देशात १ लाख १२ हजार ३५९ कोरोनाबाधित

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १२ हजार ३५९ वर गेली आहे. तर ६३ हजार ६२४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आली आहे.

जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केला गेला आहे. १ लाख लोकसंख्येमागे जगभरात ६२.३ करोना रुग्ण आढळले आहेत. पण, भारतात ही संख्या केवळ ७.९ इतकीच आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

मृत्यूचे प्रमाण ०.२ टक्के

भारतात १ लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण ०.२ टक्के आहे. तर जगभरातील सरासरी ४.२ टक्के आहे. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी २.९ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून ३ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.४५ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छसावर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


हेही वाचा – दिल्लीः कोरोना लसीच्या नावावर दिलं विष, असा झाला खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -