घरदेश-विदेशदेशात २४ तासांमध्ये ६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले; १९४ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांमध्ये ६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले; १९४ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत मुंबईने वाढवली देशाची चिंता

जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून जगभरात कोरोनाचे जवळपास ५८ लाख रुग्ण झाले आहेत. मागील २४ तासात जगातील २१३ देशांमध्ये १ लाख ३ हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर २४ तासात ५ हजार १८६ जणांचा बळी गेला आहे. तर गेल्या २४ तासांत भारतात ६ हजार ५६६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ५८ हजार ३३३ झाला आहे. यामध्ये ८६ हजार ११० रुग्ण सक्रिय आहेत तर, आतापर्यंत ६७ हजार ६९२ लोकं बरी झाली असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मृतांचा आकडा ४ हजार ५३१ वर पोहोचला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण ५७ लाख ९२ हजार ३१४ लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ५७ हजार ४७१ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २४ लाख ९८ हजार ८८४ रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

मृतांच्या आकड्यात भारत १४ व्या स्थानावर

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृतांच्या आकड्यांमध्ये भारताचा १४वा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्रिटन आणि इटली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर फ्रान्स, स्पेन, ब्राझील, बेल्जियम, जर्मनी, मॅक्सिको, नॉर्व्हे आणि इराण यांचा क्रमांक लागतो. तर कॅनाडा ११व्या, नेदरलॅंड १२, चीन १३ आणि भारत १४व्या क्रमांकावर आहे.


Coronavirus: WHO सर्व सामान्य लोकांकडून देखील घेणार निधी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -