घरCORONA UPDATECoronaVirus: देशात सर्वाधिक ९ हजार ८८७ नव्या रुग्णांची नोंद; २९५ जणांचा मृत्यू

CoronaVirus: देशात सर्वाधिक ९ हजार ८८७ नव्या रुग्णांची नोंद; २९५ जणांचा मृत्यू

Subscribe

सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

देशात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात शुक्रवारी ९ हजार ८८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले.

भारताने इटलीला मागे टाकलं असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये २ लाख ३४ हजार ५३१ कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजार ११७ वर पोहोचला आहे. त्यात १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ लाख १४ हजार ०७३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. भारतात कोरोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे.

- Advertisement -

राज्यात २४ तासांत २४३६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात शुक्रवारी २ हजार ४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ८० हजार २२९ वर पोहोचला आहे. यामध्ये ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून राज्यात शुक्रवारी १ हजार ४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडण्यात आलेलं आहे. आज १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा २८४९ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचे ५ लाख २२ हजार ९४६ नमुने पाठवण्यात आले. यापैकी ८० हजार २२९ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


हेही वाचा – रायगडला १०० कोटींची मदत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -