CoronaVirus: करोनाचा हाहाःकार; ही आहे जगभरातील सद्यस्थिती!

New Delhi
coronavirus
अमेरिकेत एका दिवसात १६ हजार करोनाचे रुग्ण; २४ तासांत २६८ जणांचा मृत्यू

जगभरात करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ७५ हजार २७१वर पोहोचली आहे. तर यापैकी २१ हजार २९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजार ८२० करोनाचे रुग्ण अजूनही गंभीर आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे १ लाख १० हजार ५३४ करोनाचे रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत. आता चीनमधील परिस्थितीत ही पूर्वपदावर येऊ लागली आहे. करोना व्हायरस जिथे उद्यास आलेल्या वुहान शहरातला लॉकडाऊन लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या ८ एप्रिलला हे लॉकडाऊन संपुष्टात येणार असल्याचं समोर येत आहे. परंतु इटली, स्पेश अमेरिकेत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढ आहे.

करोनामुळे इटलीत मृत्यू तांडव

इटलीमध्ये चीनपेक्षा दुप्पट बळी जात आहेत. एकाच दिवसात इटलीत सहाशे पेक्षा जास्त लोकांना करोनामुळे मृत्यू होत आहे. इटलीतील लोम्बार्डी प्रांतात सर्वाधिक नुकसान होत आहे.

देशात देखील करोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ

देशातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत १२ बळी गेले आहे. तर ६५७ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत.

इतर देशातील आतापर्यंत करोनाची आकडेवारी

चीन

चीनमधील वुहान शहरात करोना व्हायरस उद्यास आला. आतापर्यंत चीनमध्ये ८१ हजार २८५ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार २८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

इटली

इटलीतील करोनाग्रस्तांचा आकडा हा ७४ हजार ३८६वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ७ हजार ५०३वर पोहोचला आहे.

अमेरिका

अमेरिकेत ६८ हजार ३४७ लोक करोनाग्रस्त झाले आहेत. त्यापैकी १ हजार ४० बळी गेले आहेत.

स्पेन

स्पेनमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या ४९ हजार ५१५वर पोहोचली आहे. यामधील ३ हजार ६४७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांच्या आकडेवारीत इटली पाठोपाठ स्पेनचा नंबर लागतो.


हेही वाचा – CoronaVirus : असं वागा जणू तुम्हालाच करोना झालाय – न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचं आवाह


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here