घरCORONA UPDATECoronavirus Updates: रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस, रिेकवरी रेट ४१ टक्के...

Coronavirus Updates: रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस, रिेकवरी रेट ४१ टक्के – आरोग्य मंत्रालय

Subscribe

भारतात रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस एवढा झाला आहे. याबाबतची माहिती आज आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत देशात रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस एवढा झाला असून रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के एवढा झाला असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी आयसीएमआरचे डॉ. रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, आज दुपारी १ वाजेपर्यंत २७,५५,७१४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये १८,२८७ चाचण्या घेण्यात आल्या.

एम्पॉवर्ड ग्रुप १ चे अध्यक्ष डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १९ तारखेला १ कोटी उपचार पूर्ण झाले. जेव्हा आम्ही देशात लॉकडाऊन सुरू केला, तेव्हा कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर ३.४ दिवस होता, आज तो दर १३.३ दिवस झाला आहे. सर्वांनी मिळून देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखला. त्याचबरोबर आतापर्यंत ४८,५३४ कोविड-१९ रूग्ण बरे झाले आहेत, जे आतापर्यंत एकूण रुग्णांच्या ४१ टक्के आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर ३ एप्रिल २०२० पासून सतत घटत आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी केली नसती तर आज रुग्णांची संख्या जास्त होणार होती. सध्या (२१ मे पर्यंत) कोरोनाचे सक्रिय रुग्ण काही राज्ये आणि शहरे/जिल्ह्यात केंद्रित आहेत. पाच राज्यांत सुमारे ८० टक्के रुग्ण आहेत, ५ शहरांत ६० टक्क्यांहून अधिक, १० राज्यात ९० टक्क्यांहून अधिक आणि दहा शहरांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत.


हेही वाचा – केंद्राच्या बोगस पॅकेजमुळे फडणवीसांची राज्याकडे आर्थिक पॅकेजची मागणी – जयंत पाटील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -