घरदेश-विदेशब्रिटनपूर्वीच 'या' देशात कोरोनाच्या नवा स्ट्रेननं केली होती Entry!

ब्रिटनपूर्वीच ‘या’ देशात कोरोनाच्या नवा स्ट्रेननं केली होती Entry!

Subscribe

चिंताजनक परिस्थितीत एक धक्कादायक माहिती समोर

देशात कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात येत असतानाच कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननी देशात एकच खळबळ उडाली आहे. या नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याच चिंताजनक परिस्थितीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननी डोकं वर काढलं असताना कोरोनाचा हा नवा स्ट्रेन नोव्हेंबर महिन्यातच जर्मनीमध्ये आला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीच्या उत्तर भागातील एका वयोवृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या व्यक्तीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे त्याच्या मृत्यूनंतर समोर आल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, संशोधकांना जीनोम सिक्सेसिंगच्या मदतीने या रुग्णाला व्यक्ती B1.1.7 व्हायरसची बाधा झाली होती. ब्रिटनमध्ये फैलाव होत असलेला हाच नवा स्ट्रेन असल्याचे जर्मनीतील लोअर सॅक्सोनी राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. या नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र तिच्यावर केलेल्या उपचारानंतर ती बरी झाली.

- Advertisement -

दरम्यान, हनोवर मेडिकल स्कूलच्या एका टीमने जीनोम सिक्वेसिंगच्या सहाय्याने या कोरोनाच्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनचा शोध लावला. यासह जर्मनीतील प्रमुख विषाणूतज्ज्ञ क्रिश्चिन ड्रॉस्टेन यांचा समावेश आहे तर बर्लिनच्या चॅराइट रुग्णालयाच्या चमूने याला मंजूरी देखील दिल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय २० नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण

- Advertisement -

SARS-CoV-2 या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतात झाला आहे. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेनमार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलीया, इटली, फ्रान्स, स्‍वीडन, स्वीत्झर्लंड, स्‍पेन, कॅनाडा, जर्मनी, लेबनॉन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरनाचा शिरकाव झाला आहे. त्यांनतर तो भारतातही आला आहे. भारतात आढळलेल्या २०  रुग्णांपैकी तीन जण बंगळुरु दोन हैदराबाद आणि एक रुग्ण पुणे येथील आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मुलीलासुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतलेली आहे. तर कर्नाटकातील आरोग्यमंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, ७ जणांना नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनची लागण झाली असल्याचेही समोर आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -