घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना विषाणूची लस डिसेंबर पर्यंत बाजारात येण्याची शक्यता - चीन

कोरोना विषाणूची लस डिसेंबर पर्यंत बाजारात येण्याची शक्यता – चीन

Subscribe

चीन सरकारच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने चीन निर्मित कोरोना लस या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते असं म्हटलं आहे.

चीन निर्मित कोरोना लस या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते, असं चीन सरकारच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने (SASAC) म्हटले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीचॅटवर ही माहिती दिली आहे. अहवालानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्टने ही लस तयार केली आहे. चाचणी दरम्यान २००० लोकांना ही लस दिली गेली होती.

या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस ही लस बाजारात येऊ शकते, असं चीन सरकारच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाने म्हटलं आहे. ही लस क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स हे सरकारच्या फार्मास्युटिकल ग्रुप सिनोफार्मशी संबंधित आहेत. मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोग सिनोफार्मच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवते.

- Advertisement -

हेही वाचा – पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, रेल्वे यासह ‘हे’ नियम उद्यापासून बदलणार


अहवालानुसार, बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स एका वर्षात १० ते १२ कोटी डोस लस तयार करू शकतात. तथापि, चीनमध्ये एकूण ५ कोरोना विषाणूच्या लसींवर चाचण्या सुरू आहेत. परंतु बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या लसीवर इतर कोणत्याही कंपनीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -