घरदेश-विदेशGood News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी

Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी

Subscribe

अमेरिकी सरकार डिसेंबरमध्ये याच्या वापरासाठी मंजूरी देण्याची शक्यता

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेची कंपनी मॉडर्ना इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बँसेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर नोव्हेंबरमध्ये लसीच्या तिसऱ्या चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम पुढे आले तर अमेरिकी सरकार डिसेंबरमध्ये याच्या वापरासाठी मंजूरी देण्याची शक्यता आहे. मंगळवारी बँसेल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर कोरोनाची मानवी चाचणी यशस्वी झाली तर तात्काळ डिसेंबरमध्ये लस सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

मॉडर्नाने जुलै महिन्यात ३० हजार स्वयंसेवकावर लसीचे परिक्षण सुरू केले होते. चाचणी दरम्यान, ५० टक्के स्वयंसेवकांना लस डोस आणि उर्वरित स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला होता. या चाचणीचे सगळे अहवाल आणि माहिती नोव्हेंबरपर्यंत येईल असेही बँसेल यांनी सांगितले. चाचणी केल्यानंतर त्याचा अखेरचा रिपोर्ट तयार होण्यासाठी संपूर्ण परीक्षण करावे लागते. यावेळी लस दिल्यानंतर कोणामध्ये काय बदल झाला, याची नोंद आणि परीक्षण करणे महत्त्वाचे असते. लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ५३ लोकांना लस दिल्यानंतर त्यांचा धोका कमी झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, जर पहिल्या अंतरिम विश्लेषणामध्ये लसचा प्रभाव पुरेसा नसेल तर जेव्हा १०६ स्वयंसेवकांनी संसर्गाची लक्षणे दर्शविली तेव्हा ते दुसरे विश्लेषण करतील. यास डिसेंबरपर्यंत लागू शकेल आणि अशा स्थितीत पुढील वर्षाच्या जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरूवातीच्या आठवड्यात ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जर अंतिम टप्प्यामध्ये कोरोनाच्या लसीचा असाच प्रभाव दिसला तर ही मोठी आनंदाची बाब असणार आहे. यानंतर मॉडर्ना तात्काळ याच्या मंजूरीसाठी सरकारकडे निवेदन करणार असल्याचे बँसेल यांनी सांगितले आहे.


पालिका रुग्णालयात रेमडेसिवीरच्या तुटवड्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -