घरताज्या घडामोडीधक्कादायक! कफ सिरपमध्ये विष; ९ चिमुरड्यांचा मृत्यू

धक्कादायक! कफ सिरपमध्ये विष; ९ चिमुरड्यांचा मृत्यू

Subscribe

कफ सिपरमधील विषारी पदार्थामुळे ९ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जम्मूमधील ऊधमपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

एखाद्या वेळेस खोकला झाला तर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी प्राथमिक उपचार म्हणून कफ सिरप घेतले जाते. मात्र, हेच कफ सिरप चिमुरड्यांच्या जिवावर बेतल्याचे समोर आले आहे. कफ सिपरमधील विषारी पदार्थामुळे ९ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जम्मूमधील ऊधमपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कोल्डबेस्ट-पीसी असे विष आढळलेल्या कफ सिरपचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर जवळपास ८ राज्यात या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे.

जम्मू – काश्मीरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक औषध नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हिमाचल प्रदेशातील डिजिटल व्हिजन नावाची औषध कंपनी बनवते. चंदीगडच्या Pegimer अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या जिल्ह्यातील मुलांचा मृत्यू हा कोल्डबेस्ट-पीसी या कफ सिरपमधील डायथिलीन ग्लायकोल या विषारी पदार्थामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

जम्मूच्या डॉ. रेनू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ९ लहान मुलांचा मृत्यू डिसेंबर २०१९ शेवटचा आठवडा ते १७ जानेवारी दरम्यान झाला. या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे. या सिरपच्या पुढील चाचणीसाठी जम्मूजवळील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन तसेच चंदीगडच्या औषध तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. यात डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी पदार्थ आढळला आहे. दरम्यान, अद्याप याबाबतचा अंतिम रिपोर्ट आलेला नसून या चिमुरड्यांचा मृत्यू कोल्डबेस्ट-पीसी सिरपमुळे झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – मुंबई अलिबाग रो रो बोटीचा पहिला लुक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -