Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोना लसींना परवानगी मिळाल्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले...

कोरोना लसींना परवानगी मिळाल्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

मोदींनी ट्विटरवरुन देशात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद केला व्यक्त

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच आता भारत सरकारने भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असल्याचे म्हणत सर्वांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

मोदींनी आपल्या ट्वविटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. “जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल. या मोहीमेसाठी जीवतोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

तसेच, “ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लसी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. तो आत्मनिर्भर भारत, ज्याचा आधार आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया…” असं म्हणत “कठीण परिस्थितीममध्ये असाधारण सेवाभावासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व करोना योद्ध्यांच्याप्रती कृतज्ञता व्यकत करतो आहे. देशवासियांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही सैदव त्यांचे आभारी राहू.” असं म्हणत मोदींनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केलं आहे.

तर डीसीजीआयने स्पष्ट केले आहे की, थोडा ताप, वेदना, अ‍ॅलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. त्यामुळे या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लस ११० टक्के सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – DCGI ची मोठी घोषणा! कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

- Advertisement -