Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कांदा निर्यातीतून देशाला २१०० कोटींचे परकीय चलन

कांदा निर्यातीतून देशाला २१०० कोटींचे परकीय चलन

२०१८-१९ च्या आर्थिक वर्षातील निर्यातीची आकडेवारी यंदा पार होण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

लासलगाव – कोरोनाच्या संसर्गामुळे देशासह विदेशात लॉक डाउन असतानाही देशातुन एप्रिल ते १४ सप्टेंबर २०२० पर्यंत कांद्याची १३ लाख ०६ हजार मैट्रिक टन इतकी निर्यात झाली असून, कांदा निर्यातीतुन २०९१ कोटी रूपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोना काळात परकीय चलन मिळाले. साडेतीन महिन्यांच्या निर्यातबंदीनंतरही ३ महिन्याचा या आर्थिक वर्षातील कालावधी बाकी असून, पुन्हा निर्यात खुली झाल्याने २०१८-१९ च्या आर्थिक वर्षातील निर्यातीची आकडेवारी यंदा पार होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

यंदा कोरोनाचा संसर्ग असतानाही कांदा निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ कांद्याच्या हंगामात १३० टक्के इतके बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा देशा-विदेशात होत असल्याने कांदा उत्पादकांना कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते १४ सप्टेंबर पर्यंत कांद्याची १३ लाख ६ हजार मेट्रिक टन इतकी कांद्याची निर्यात झाली होती. त्यातून २०९१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. यंदा लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रातील निर्यात ४३.३ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारला परकीय चलन मिळण्यास मोठी मदत झाली. यामुळे सरकारने आयात- निर्यात धोरणात बदल करतांना या गोष्टींचा विचार केला पाहिजे, असे मत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

- Advertisement -