घरदेश-विदेशआणि त्यांनी रुग्णालयातच केले लग्न

आणि त्यांनी रुग्णालयातच केले लग्न

Subscribe

प्रेमसंबधांना विरोध करणाऱ्या घरच्यांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न निवडणाऱ्या युगुलाचे रुग्णालयातच लग्न लावण्यात आले आहे. विष पिऊन आत्महत्या केल्यानंतर या युगुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

प्रेमसंबधातून लग्न करण्याची एक वेगळीच घटना तेलंगाना राज्यात समोर आली आहे. प्रेमसंबधांना घरच्यांनी नकार दिल्याने एका युगुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे प्राण वाचल्यानंतर घरच्यांनी युगुलाच्या लग्नाला होकार दिला. होकार दिल्यानंतर त्यांचे रुग्णालयताच लग्न लावण्यात आले. या घटनेनंतर हे युगुल सुखावले आहेत. आपल्याला पूर्नजन्म मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय लवकर घेतल्यामुळे मुलाने देवाचे आभार मानले आहे. हैद्राबाद येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या विकराबाद येथील रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयात लग्न करण्याची ही पहिलीच घटना असल्याने डॉक्टरांना आणि तेथील कर्मचारीही या लग्नाला उपस्थित होते.

बहिणीच्या लग्नादरम्यान झाली होती ओळख

‘मीरर नाव्ह’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रेश्मा (१९) आणि नवाज (२१) असे या दोघांचे नाव आहे. रेश्माच्या मोठ्या  बहिणीने नवाजच्या मोठ्या भावाशी एक वर्षापूर्वी लग्न केले होते. विकारबाद जिल्ह्यातील कुकिन्धा येथे रेश्मा आपल्या कुटुंबीयासह राहात होती. बहिणी लग्नादरम्यान रेश्मा आणि नवाजची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमसंबधामध्ये झाले. मात्र या दोघांच्या लग्नाला घरातून विरोध केला जात होता. विरोधामुळे रेश्माने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रेश्माने घरीच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रेश्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

रुग्णालयात आल्यावर केला आत्महत्येचा प्रयत्न

नवाजला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात धाव घेऊन त्यानेही तिच्यासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर डॉक्टरांनी दोघांचे प्राण वाचवले आणि घरच्यांनाही यांच्या प्रेमासमोर नमते घ्यावे लागले. या दोघांचे रुग्णालयातच लग्न लावून देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -