घरदेश-विदेशCovid 19 चा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर

Covid 19 चा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर

Subscribe

महिलांच्या आरोग्यामध्ये मासिक पाळी (Menstural cycle) ही सर्वात महत्वाची अशी बाब आहे. पण कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेक महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम झाला आहे. अनेक महिलांनी मासिक पाळी नियमित येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १० कोटींहून अधिक लोकांना फटका बसलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे काही परिणाम हे अल्प कालावधीचे तर काही दीर्घ कालावधीचे होत असल्याच्या तक्रारी आता जगभरातून येत आहेत. महिला, गरोदर महिला यांना कोरोनाच्या हाय रिस्क श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. पण कोरोनाची लागण झालेल्या महिलांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये एक प्रकर्षाने गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे कोरोनाची लागण झाल्यानंतर महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाचा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर कसा होतोय ?
जगभरातील ज्या महिलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या महिलांना अनियमित मासिक पाळीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार अनेक महिलांकडून करण्यात आली आहे. कोरोनावर उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही अनेक महिलांना अनियमित मासिक पाळी, जास्त दिवसांची मासिक पाळी आणि पाळीच्या कालावधीत जास्त रक्तस्त्राव यासारख्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक प्रकारे मासिक पाळीत बदल झाल्याचे पहायला मिळत आहेत.

- Advertisement -

कोरोनानंतर मासिक पाळीमुळे आणखी होणारे परिणाम म्हणजे अशक्तपणा येणे, काम करण्याची ताकद कमी होणे आणि तणाव वाढणे यासारखी परिणाम प्रामुख्याने दिसून आले आहेत. त्यामुळे मासिक पाळी कशी असणार यानुसार हे परिणाम कमी अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. ‘मेडिकल न्यूज टुडे’च्या अहवालानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांना रक्ताच्या गाठी, पीएमएसची लक्षणे यासारख्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. काही महिलांना कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर अनेक महिन्यानंतर मासिक पाळी नियमितपणे आल्याचे सांगितले आहे. तर कोरोना काळात महिलांच्या आरोग्यावर होणारा तणावाचा परिणाम, वर्क फ्रॉम होम यासारख्या गोष्टींचाही परिणाम झाला आहे. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासूनच अनेक महिलांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही मासिक पाळीवर परिणाम झाल्याची माहिती दिली आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -