घरCORONA UPDATECovid 19 : आता लगेच सापडणार कोरोनाचे रुग्ण; Google Map चे नवे...

Covid 19 : आता लगेच सापडणार कोरोनाचे रुग्ण; Google Map चे नवे फिचर लाँच

Subscribe

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आळा घालण्याचा एकच मार्ग तो म्हणजे रुग्णांता शोध घेऊन त्यांचे त्वरित विलगीकरण करणे. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळून रुग्णसंख्या नियंत्रणात आणता येईल. यासाठी आता गुगल मॅप सरसावले असून त्यांनी एक विलक्षण असे फिचर अॅड केले आहे. गुगल मॅपच्या युजर्सना ही सुविधा मिळणार आहे. या नव्या फिचरच्या सहाय्याने तुमच्या क्षेत्रात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे. COVID लेअर नावाने हे नेव फिचर लाँच करण्यात आले असून ते अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. यामध्ये कोरोना रुग्णांची माहिती तसेच आजारासंबंधीत अपडेटदेखील पाहता येणार आहेत.

या नव्या फिचरसंबंधी गुगल मॅपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, मॅपमध्ये नवीन लेअर फिचर अॅड केले आहे. जे तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील कोविड १९ केसेस आणि रुग्णांची संख्या यासंबंधीत अपडेट देतील. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारे हे फिचर याच आठवड्यात लाँच होणार आहे.

- Advertisement -

असे चालते हे फिचर 

कंपनीच्या वतीने सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, गुगल मॅपमध्ये लेअर बटन दिले जाणार आहे. जो स्क्रिनवर डाव्या बाजूला असेल. या बटनावर क्लिक केल्यास COVID-19 info हे बटन दिसेल. या फिचरवर क्लिक केल्यास हे मॅप कोविडच्या स्थितीनुसार बदलत जाईल. या फिचरमध्ये दररोज तुमच्या क्षेत्रातील गेल्या सात दिवसांतील अपडेटेड माहिती मिळू शकणार आहे. तसेच तुमच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत की कमी होत आहेत याचीही माहिती येथे समजणार आहे.

हेही वाचा –

बापरे! ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -