UNICEF आणि WHO चा इशारा; Corona चा फैलाव कायम राहिल्यास गर्भवती महिलांना धोका

Coronavirus चं संकट वाढलं तर जगभरात १६ सेकंदाला जन्माला येईल मृत बालक

जगभरात कोरोनाचे थैमान थांबायचे नाव नसून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे सांगितले जात होते मात्र आता जागतिक आरोग्य संघटना आणि Unicef म्हणजे संयुक्त राष्ट्र बाल निधीने कोरोनाच्या संकटाविषयी आणखी एक भीती व्यक्त केली आहे. यानुसार, कोरोनाचा वाढता संसर्ग गर्भवती महिलांना देखील धोक्याचे ठरू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार, कोरोनाचा कहर आणखी वाढला तर दर १६ सेकंदाला एक मृत मूल जन्माला येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर दरवर्षी २० लाख मृत अर्भकं जन्माला येतील असे देखील त्यांनी म्हटले आहे. विकसनशील देशांमध्ये या संदर्भात मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

WHO ने व्यक्त केली भीती

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र बाल निधीचे कार्यकारी निदेशक हेनरिटा फोर आणि सांगितले की, प्रत्येक १६ सेकंदाला एक गर्भवती महिला मृत मुलाला जन्म देईल. यामुळे सुरक्षित उपचार, नीट काळजी घेणे आणि प्रशिक्षित डॉक्टरांकडून डिलिव्हरी करून घेतल्याने ही समस्या येणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. महिला गर्भवती झाल्यानंतर २८ आठवड्यांनी मृत मूल जन्माला आले तर त्याला ‘स्टिलबर्थ’ असे म्हटले जाते. मागील वर्षी सहारा आफ्रिका किंवा दक्षिण आशियामध्ये प्रत्येक चार महिलांच्या पाठी ३ महिला मृत मुलाला जन्म देत होत्या.

जर कोरोनाचा फैलाव वाढता राहिला तर…

कोरोनाच्या या संकटाचा सर्वच देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सहारा आफ्रिका किंवा दक्षिण आशियामध्ये झालेल्या ‘स्टिलबर्थ’ च्या अनेक घटना या डिलिव्हरीवेळी घडल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, विकसनशील देशांमधील अल्पसंख्यांक महिलांमध्ये ही प्रकरणं अधिक आहेत. कॅनडामध्ये इन्यूइट जमातीच्या महिलांमध्ये ‘स्टिलबर्थ’ प्रकरण सर्वाधिक आहे. त्याचबरोबर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये याचं प्रमाण सहा टक्के आहे. जर कोरोनाचा फैलाव वाढता राहिला तर पुढील वर्षापर्यंत ११७ विकसनशील राष्ट्रांमध्ये २,००,००० ‘स्टिलबर्थ’ प्रकरणं घडू शकतात. त्यामुळे योग्य उपचार आणि काळजी घेतली तर या घटना कमी होऊ शकतात असं देखील संघटनेने म्हटले आहे.


पुरुषावरही बलात्कार होतो; ३७६ D चित्रपटातून पुरुषांवरील लैंगिक अत्याचारावर भाष्य