वुहानमध्ये ज्या ठिकाणाहून पसरला होता कोरोना, ‘ती’ बाजारपेठ पुन्हा सुरू!

बाजारातील दुर्गंधी, घाणीचं साम्राज्य यामुळेच वुहानमध्ये कोरोना संसर्ग फैलण्याचे एकमेव कारण ठरले

china
वुहानमध्ये ज्या ठिकाणाहून पसरला होता कोरोना, 'ती' बाजारपेठ पुन्हा सुरू!

ज्या ठिकाणाहून कोरोना व्हायरस पसरला चीनमधील वुहान शहरात पुन्हा जीवंत प्राण्यांचा बाजार सुरू झाला आहे. या बाजारपेठेत जीवंत जनावरांची विक्री करणाऱ्या लोकांनी आपली दुकानं पुन्हा सुरू केली आहे. पण पुर्वीच्या बाजारापासून थोड्या अंतरावर नवीन ठिकाणी हा बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या बाजारातून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याचे सांगितले जात आहे, त्या बाजाराचे नाव द हुआनान सीफूड होलसेल मार्केट असे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव हुआनान सीफूड होलसेल मार्केटमधून प्रथम झाला. त्यानंतर १ जानेवारी रोजी हा जीवंत प्राण्यांचा बाजार बंद करण्यात आला. या बाजारात अशा सर्व जीवंत प्राण्यांचे मांस मिळते जे माणसं खाऊ शकतात. या वुहानच्या जनावरांच्या बाजारात मांस आणि जवळपास ११२ प्रकारच्या जीवंत प्राण्यांचे अवयव विकले जातात. याशिवाय मृत प्राणी स्वतंत्रपणे विकले जातात.

चीन सरकारने हा बाजार दुसर्‍या ठिकाणी हलविला आहे. हुआनान सीफूड मार्केट हा बाजार आता उत्तर हानकोउ सीफूड मार्केटच्या सोबत भरतो. या बाजारात जीवंत क्रेफिश आणि शेलफिश विकले जातात. नवीन ठिकाणी बाजारपेठ उभारणाऱ्या दुकानदारांनी सांगितले की, काही दिवसांनी बाजार पुन्हा आपल्या जुन्या जागेवर आणता येईल, अशी त्यांना आशा आहे. यासह कोरोना व्हायरसमुळे बाजार बंद झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आमचा रोजगार काढून घेण्यात आला आहे. आता नवीन ठिकाणाहून काम करावे लागत असल्याचे हुआनान सीफूड मार्केटमध्ये दुकान सुरू करणार्‍या एका महिलेने सांगितले.

तुम्हाला येथे कोंबडा, डुक्कर, गाय, म्हशी, कोल्हा, कोआला, कुत्रा, मोर, रॉयल, कोकरे, बदके, ससा, शुतुरमुर्ग, उंदीर, हरीण, साप, कांगारू, मगर, विंचू, कासव, उंट, मगरी, गाढव दिसतील. तसेच बेडूक, ईल्स, याक हेड, किटकांसह सर्व प्रकारच्या प्राण्यांचे मांस विक्री करता उपलब्ध असल्याचे बघायला मिळेल.हे सर्व प्राणी वुहानच्या पशु बाजारात एकत्र विकले जातात. त्यांना तेथेच कापण्यात येते. त्यांच्यामधून रक्त निघत असल्याने त्यावर जीव जंतूं बसतात. बाजारातील दुर्गंधी, घाणीचं साम्राज्य यामुळेच वुहानमध्ये कोरोना संसर्ग फैलण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण ठरू शकते.

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ही बाजारपेठ इतकी गर्दीने भरली असून तेथे चालणे अवघड झाले आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून हा बाजार अद्याप बंद आहे. पूर्वी लोक या जुन्या बाजारात जगभरातून प्राणी खरेदी करण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  या बाजारात साप माशांबरोबर ठेवले जातात. किलोच्या भावात बेडूक उपलब्ध असून त्यांची विक्री केली जाते. चीनमधील लोक त्यांना त्यांच्या गरजेनुसार घेतात. चिनी लोक आवश्यक तेच प्राण्यांचे अंग खरेदी करतात. ज्या प्राण्यांच्या अवयवांची विक्री होत नाही, तो कचरा म्हणून बर्‍याच तास त्या बाजारात पडून राहतो.


सायकलवरून ११ देशांचा प्रवास करायला निघाला, लॉकडाऊनमध्ये अडकला आणि…