घरदेश-विदेशUS Election: निकालानंतर ट्रम्प यांनी केलं पहिलं भाषण; म्हणाले...

US Election: निकालानंतर ट्रम्प यांनी केलं पहिलं भाषण; म्हणाले…

Subscribe

निवडणुकीच्या निकालांतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे पहिलंच सार्वजनिक भाषण आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाले. दरम्यान निकालानंतर जो बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प हेदेखील आपला पराभव स्वीकारलेला नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केले. निवडणुकीच्या निकालांतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण आहे.

दरम्यान, जो बायडेन यांना एरिझोना आणि जॉर्जिया प्रांतातदेखील विजय मिळाला. शुक्रवारी त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. यासोबतच डेमोक्रेटिक पक्षाला ३०६ तक रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल़्ड ट्रम्प यांना २३२ मतं मिळाली. ट्रम्प यांना नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय मिळाला. यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी डोनाल़्ड ट्रम्प यांनी संवाद साधला होता.

- Advertisement -

यासह पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपनी फायझरच्या करोना लसीबद्दल नवी माहिती दिली. तसेच २०२१ च्या एप्रिल महिन्यापर्यंत अमेरिकेच्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली.

“काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि करोनाचा अतिजास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल. आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला फायझरची लस मोफत देण्यात येणार आहे,” असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

- Advertisement -

Pfizer कंपनीचा दावा

अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी असून फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकर कोरोना लस येणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, लवकरच कोरोनावरील लस येणार असून लस ९० टक्के प्रभावी आहे आणि ही आनंदाची बातमी आहे.


Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -