Corona in India: देशात बाधितांचा आकडा ६९ लाखांवर; २४ तासांत ७३,२७२ नवे रूग्ण

सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६९ लाख ७९ हजारांहून अधिक झाला आहे

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतय आहे. यासह दिलासादायक म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७३ हजार २७२ नवीन रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ६९ लाखांचा टप्पा पार केला केला असून तो सध्या ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासात देशात ७३ हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ९२६ लोकांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६९ लाख ७९ हजारांहून अधिक झाला असून त्यापैकी ८ लाख ८३ हजार १८५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशात ५९ लाख ८८ हजार ८२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत १ लाख ७ हजाराहून अधिक जणांचा जीव गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात काल दिवसभरात ११ लाख ६४ हजार ०१८ नमुन्यांची चाचण्या करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात ८ कोटी ५७ लाख ९८ हजार ६९८ जणांच्या कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.