घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत बाधित रुग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Live Update: मुंबईत बाधित रुग्णापेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

Subscribe

मुंबई मागील २४ तासांत ५०३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८७ हजार ५१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील आता कोरोनामुक्त होण्याची संख्या ३ लाख ६ हजार ४५वर पोहोचली आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ७५२ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ ० लाख ९ हजार १०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार ७८५ मृत्यू झाला असून १९ लाख १२ हजार २६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे ९४ वे अध्यक्ष झाले आहेत.


शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या – शरद पवार

जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मागण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ११ वाजता सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित होण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ओबीसी मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सरकारच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार स्वीकारणार आहेत.

- Advertisement -

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रिम्स प्रशासनाने त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना श्वसनास त्रास होत असून त्यांची किडनी २५ टक्केच काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.


सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू?

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी पुन्हा रुळावर धावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं चित्र दिसतंय. मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत, अशी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. तर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटत असल्याने राज्यात पुन्हा लोकल सुरू करण्याच्या की नाही या विचारात सरकार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्या फाईलमध्ये फेरफार मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला आहे.


ओबीसी समाजाचा आज जालन्यात एल्गार

जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


एल्गार परिषदेला परवानगी

येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी गेल्या वर्षी २१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र, परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती.


मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकरी मागण्यांचे गीत सादर करत, किसान सभेचे ध्वज हाती घेत नाशिकमधून शेकडो शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या २६ जानेवारी रोजी हे शेतकरी राजभवनवर धडकणार आहेत.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -