घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात ३ हजार ५२४ नवे रुग्ण, ५९ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात ३ हजार ५२४ नवे रुग्ण, ५९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ३ हजार ५२४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ३५ हजार ६३६ झाली आहे. राज्यात ५२ हजार ९०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९ हजार ५२१ वर पोहोचला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


पीएमसी प्रकरणी प्रविण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त

- Advertisement -

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. यात प्रविण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


रेल्वे बोर्डचे चेअरमन आणि सीईओ पदी सुनील शर्मा यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. कॅबिनेटच्या एप्वाइंटिंग कमिटीने नियुक्तीला मंजूरी दिली.

- Advertisement -

देशात ३१ डिसेंबपर्यंत १७ कोटी ३१ लाख ११ हजार ६९४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १० लाख ६२ हजार ४२० नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


सेन्सेक्स ११४ अंकांनी वधारला असून सध्या ४७ हजार ८६६ झाला आहे. तर निफ्टीची १४ हजार १६ने सुरुवात झाली.


देशात गेल्या २४ तासांत २० हजार ३६ नवे रुग्ण आढळले असून २३ हजार १८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २५६ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी २ लाख ८६ हजार ७१०वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९८ लाख ८३ हजार ४६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ लाख ५४ हजार २५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शौर्यदिनानिमित्ताने कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजय-स्तंभाला अभिवादन केले.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ कोटी ३८ लाख ६ हजार पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १८ लाख २५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ५ कोटी ९३ लाखांहून अदिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -