घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत मागील २४ तासांत आढळले ५७८ नवे रुग्ण, ८ जणांचा...

Live Update: मुंबईत मागील २४ तासांत आढळले ५७८ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ५७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९० हजार ९१४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईतले ४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ७० हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत असून मुंबईच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ३१४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख १९ हजार ५५०वर पोहोचली. यापैकी आतापर्यंत ४९ हजार २५५ जणांचा मृत्यू झाला असून १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस देण्यात आली आहे. येत्या २९ डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


दक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांना तीव्र रक्तदाबाचा त्रास झाल्याने शुक्रवारी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘थलायवा’ रजनीकांत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. सुपरस्टार रजनीकांत गेल्या १० दिवसांपासून हैदराबादमध्ये चित्रीकरण करत होते. २२ डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती निगेटिव्ह आली असल्याची माहितीही अपोलो रुग्णालयाने दिली होती. आज त्यांना अपोलो रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


गॅस दरवाढीच्या विरोधात परभणीत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहापासून निकामी सिलेंडर घेऊन मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर रस्त्यावर चूल मांडून या महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाक केलाय आणि केंद्र सरकारचा निषेध केला आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.


कांदिवली पश्चिमेतील चारकोप विभागात असलेल्या साईबाबा मंदिरात विजेचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय.


पंतप्रधान मोदींची या वर्षातील शेवटची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात सुरु झाली आहे. मोदी यांची या वर्षाची शेवटची नम की बात आहे. शेवटची मन की बात असल्यामुळे मोदी काय बोलणार यांकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.


केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांनी सरकारशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी शेतकरी संघटनांनी सरकारबरोबर पुढच्या फेरीतील चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करावी, असे पत्र शेतकरी संघटनांच्या वतीने पाठवण्यात आले आल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. चर्चा सरकारने ठरवलेल्या मुद्दय़ांवर नाही तर शेतकरी संघटनांनी पत्रात मांडलेल्या चार प्रमुख मुद्दय़ांवर केली पाहिजे, अशी अटही घालण्यात आली आहे.


मुंबईच्या कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात भीषण आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -