जबरदस्त! व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; मगरीने लावली स्पीडबोटशी रेस

मगरीने चक्क स्पीडबोटशी रेस लावल्याचे पाहिला मिळत आहे.

crocodile races with speedboat in viral goes video
जबरदस्त! व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; मगरीने लावली स्पीडबोटशी रेस

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. बऱ्याचदा व्हायरल व्हिडीओमध्ये प्राण्यांची झुंज, प्राण्यांनी केलेली शिकार, अत्यंत वेगाने पळणारे प्राणी असे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिले आहेत. मात्र, सध्या एका मगरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही बोलाल जबरदस्त. कारण हा व्हिडीओच तसा आहे. यामध्ये एका मगरीने चक्क स्पीडबोटशी रेस लावल्याचे पाहिला मिळत आहे.

काय आहे या व्हिडीओत?

गॅटर्स डेली या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १३ सेकंदाचा हा व्हिडीओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये वेगाने जाणाऱ्या स्पीडबोटच्या बाजूलाच पाण्यामधून अत्यंत वेगाने एक मगर त्या बोटीसह पोहताना दिसत आहे. या शर्यतीदरम्यान मगर दोनदा पाण्याच्या बाहेर आल्याचेही पाहायला मिळते. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाख ४९ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १९ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे.

युजर्सने केल्या कमेंट्स

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटल्याचे म्हटले आहे. एखादी मगर पहिल्यांदाच आपण एवढ्या वेगाने पोहताना पाहिली आहे, असं देखील काहींनी म्हटलं आहे. एका संशोधनानुसार मगर ही जमीनीपेक्षा पाण्यामध्ये अधिक वेगाने प्रवास करु शकते. पाण्यामध्ये मगरीचा वेग १५ किमी प्रती तास इतका असू शकतो. काही जणांनी हा व्हिडीओ पाहून भीती व्यक्त केली आहे. तसेच हा व्हिडीओ कुठला आहे ते आधी सांगा म्हणजे तिथे कधी जायलाच नको अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – अभिनेता परेश रावल यांची NSD च्या अध्यक्षपदी निवड