घरदेश-विदेशजवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या ; ३ जवानांचा मृत्यू

जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या ; ३ जवानांचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीर येथे केंद्रिय राखीव दलाच्या जवानाने आपल्याच सहकार्यांवर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीर येथे केंद्रिय राखीव दलाच्या एका जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे तिनही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्यानंतर जवानाने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास उधमपूरच्या बट्टल बलियान परिसरात केंद्रिय राखीव दलाच्या १८७ बटालियनच्या कॅम्पमध्ये घडली. गोळी झाडणाऱ्या जवानाचे नाव अजित कुमार असे आहे. तो उत्तर प्रदेशमधील कानपूरचा रहिवाशी आहे.

का झाडल्या गोळ्या?

केंद्रिय राखीव दलाचा जवान अजित कुमार याने बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या सर्व्हिस रायफलमधून तीन सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात तिनही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये राजस्थान येथील हेड कॉन्स्टेबल आर. पोकरमाल, दिल्लीतील योगेंद्र शर्मा आणि हरयामातील उमेद सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अजित कुमारने स्वत:वरही गोळी झाडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चौघांमध्ये काहीतरी वाद झाला होता. याच वादातून अजित कुमारने आपल्या सहकार्यांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -