CoronaVirus: सीआरपीएफ जवानांकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ३३.८१ कोटींची मदत

देशपातळीवर करोना या महासकंटाशी सामना करायाला देश सज्ज

Mumbai
crpf personnel have contributed one day salary to pms national relief fund
सीआरपीएफ जवानांकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ३३.८१ कोटींची मदत

राज्यभरासह देशभरात करोनाचे सावट असल्याने देशपातळीवर करोना या महासकंटाशी सामना करायाला देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूनंतर संपुर्ण देश २१ दिवस लॉक डाऊन असणार अशी घोषणा केली. पंतप्रधानांच्या या निर्णयाला जनता देखील चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. करोनासारख्या भीषण संकटातून देश पुढे सरसावत असताना सीआरपीएफ जवान देखील कुठे मागे राहिले नाहित. सीआरपीएफ जवानांनी मदतीचा हात पुढे करत आपल्या एका दिवसाच्या पगार पंतप्रधान सहाय्यता निधीला देत मोठी मदत केली आहे. या मदतीसाठी एकूण ३३.८१ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.

देशासोबत सीआरपीएफ जवान खंबीरपणे उभे असून करोनाविरूद्ध असलेल्या या युद्धासाठी सर्वानुमते एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात करोनाबाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १२५वर पोहोचली असून गुरूवारी एका दिवसांत पुन्हा एकदा तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर मृतांचा आकडा हा ५वर पोहोचला आहे. या दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Coronavirus Live Update: जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ५ लाखांहून अधिक!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here