घरदेश-विदेशआता प्लॅस्टिक बॉटल क्रश करा, ५ रुपये मिळवा!

आता प्लॅस्टिक बॉटल क्रश करा, ५ रुपये मिळवा!

Subscribe

प्लॅस्टिक सध्या दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या बनली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने बघायचे झाले, तर प्लॅस्टिकच्या वस्तू पर्यावरणाची अतोनात हानी करतात. मात्र, मानवाच्या जास्तीत जास्त गोष्टी या प्लॅस्टिकपासून बनल्या असल्याने नागरिकांना प्लॅस्टिकविना जगणे कठीण झाले आहे. या प्लॅस्टिक वस्तूंच्या विघटनाला प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने प्लॅस्टिकची समस्या कमी व्हावी याकरता भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेने गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर प्लॅस्टिकच्या बॉटल क्रश करणारी मशिन ठेवली आहे. या मशिनमध्ये प्लॅस्टिकची एक बॉटल क्रश केल्यास त्या व्यक्तीच्या पेटीएममध्ये पाच रुपयाची कॅशबॅक येणार आहे.

बॉटल क्रश कशी करावी?

एखादी रिकामी प्लॅस्टिक बॉटल क्रश मशिनमध्ये टाकण्यात येईल. त्यानंतर ही मशिन त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकण्यास सांगेल. त्यानुसार मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीच्या पेटीएममध्ये एका बॉटलचे पाच रुपये जमा होतील.

- Advertisement -

या स्थानकांवर बसवले जाईल क्रश मशिन

भारतीय रेल्वेने गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर बॉटल क्रश करण्याचा पहिला प्रयोग केला असून, वडोदरा विभागामध्ये येणाऱ्या चार स्थानकांवर देखील बॉटल क्रशची मशिन बसवली जाणार आहे. मकरपुरा, विश्वामित्री, बाजवा आणि अंकलेश्वर रेल्वे स्थानकांवर देखील ही मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या वडोदरा विभागाने दिली आहे.

मुंबईमध्ये या स्थानकांवर बसवले आहे क्रश मशिन

मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रश मशिन बसवण्यात आली आहेत. मात्र या बॉटल क्रशमध्ये पैसे मिळणार नसून त्याबद्ल्यात १ लिटर पाणी मिळते. ही मशिन पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, बांद्रा, अंधेरी, गोरेगाव या भागातील रेल्वे स्थांनकांवर बसवण्यात आली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -