घरटेक-वेकचीनकडून गेल्या पाच दिवसांत ४० हजार वेळा सायबर हल्ले

चीनकडून गेल्या पाच दिवसांत ४० हजार वेळा सायबर हल्ले

Subscribe

महाराष्ट्र सायबर शाखेची माहिती

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे व्यतिरिक्त चीनच्या बाजूने इतरही मार्गाने अनेक हल्ले होत आहेत. सीमेरेषेवर हल्ले करताना आता चिनी हॅकर्स भारतावर सायबर हल्ला करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांत चिनी हॅकर्सनी भारतीय माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रावर ४० हजाराहून अधिक सायबर हल्ले केले आहेत. त्याच वेळी, गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षानंतरही चीनने अद्याप माघार घेतलेला नाही. मात्र, मंगळवारी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत सैन्या मागे घेण्यास दोन्ही सैन्यांमध्ये मतैक्य झालं आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या महाराष्ट्र सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इंटरनेट वापरणाऱ्यांनी अशा हल्ल्यांबाबत सावध राहिलं पाहिजे. शिवाय त्यांनी त्यांच्या आयटी यंत्रणेचे सायबर सुरक्षा ऑडिट करावे. सायबर शाखेचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव म्हणाले की, भारत-चिनी सैन्यादरम्यान सीमेवरील तणावानंतर ऑनलाईन हल्ले वाढले आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्र सायबरने या प्रयत्नांची माहिती गोळा केली आणि त्यापैकी बहुतेक चीनच्या छंतू भागातून आढळून आले.

- Advertisement -

हेही वाचा – संवेदनशील काळात भारताला शस्त्रे देऊ नका; चीनची रशियाला विनंती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -