घरदेश-विदेशहैदराबाद बलात्कार प्रकरण : असा झाला एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा झाला एन्काऊंटर

Subscribe

स्वसंरक्षणासाठी आरोपींना गोळ्या घालण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन एन्काऊंटर का केला याची माहिती प्रसारमध्यमांना दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘या हैदराबाद बलात्कार प्रकरणी चार आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडून तपास सुरु असताना चारही आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, तरीही ते पोलिसांच्या हातून निसटले आणि पळत सुटले.

- Advertisement -

तसेच आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका आरोपींनी दगड आणि दांड्याने हल्ला चढवला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी अखेर नाईलाजास्तव पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्यात चारही आरोपींचा मृत्यू झाला,’ अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत.

आरोपींनी पोलिसांवर चढवला हल्ला

हैदराबाद येथे झालेल्या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यात आला. खूप तपास केल्यानंतर आरोपींना ३० तारखेला अटक करण्यात आली. त्यानंतर आम्हाला ४ तारखेला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी पीडितीचा मोबाईल लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. याचे प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर हल्ला चढवावा लागला आणि यात त्या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

- Advertisement -

आरोपींची होणार डीएनए टेस्ट

या घटनेतील चारही आरोपींची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा मध्येही आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपार करत आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच आम्ही सर्व चौकशीला जाण्यास तयार आहोत, असे देखील ते पुढे म्हणाले.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -