घरदेश-विदेशगाजा चक्रीवादळः मृतांची संख्या वाढली

गाजा चक्रीवादळः मृतांची संख्या वाढली

Subscribe

गाजा चक्रीवादळामुळे तामिळनाडू राज्यात जीवितहानी झाली आहे. राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाला १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपसून गाजा चक्रीवादळाने देशाती काही भागात थैमान घातला आहे. तामिळनाडू राज्यामधील काही भागात या वागळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेल्या जीवितहानीत मृतांची संख्या वाढून ४५ झाली आहे. गाजा चक्रीवादळाचा तडाखा ग्रामीण क्षेत्रांना पडला आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळावर हलवण्यात आले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीस्वामी यांनी नागपट्टिनम जिल्हाला भेट दिली. येथे झालेल्या नुकासाना त्यांनी अंदाज घेतला. याचबरोबर इतर ठिकाणच्या नागरिकांचीही त्यांनी विचारपूस केली. आपत्तीग्रस्त लोकांना लकरच मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

“सहा तासासाठी आलेल्या वादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. आपत्तीग्रस्तांची मदत करण्यासाठी महामार्गाचा वापर केला जात आहे. याच बरोबर १०० डॉक्टरांची एक तूकडी लोकांवर उपचार करत आहेत. सहा हजार लोकांना तत्काळ मदत पोहोचवण्यात आली आहे.”- मुख्यमंत्री एडप्पादी के पलानीस्वामी

- Advertisement -

नागरिकांनी केले आंदोलन

वादळानंतर तत्काळ मदत न मिळाल्यामुळे काही क्षेत्रातील नागरिकांनी राज्य सराकरचा विरोध केला आहे. कोठमंगलम येथील ग्रामीण नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांनी येथे सरकारी अधिकाऱ्यांना येण्यापासून अडवले. या आंदोलनात ५० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त कुटुंबाला १० लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमी झालेल्या प्रत्येकाला सरकारने २५ हजाराची मदत जाहीर केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -