घरदेश-विदेशतितली वादळ : 'या' रेल्वे गाड्या केल्या रद्द!

तितली वादळ : ‘या’ रेल्वे गाड्या केल्या रद्द!

Subscribe

ओडिसा राज्यामध्ये सध्या रौद्र रूप धारण केलेल्या ‘तितली’ वादळाने हाहाकार माजवला आहे. ओडिसाच्या काही भागांध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास हे वादळ येऊन धडकलं. या वादळाचा मोठा फटका बसला आहे तो ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर. या वादळामुळे परिसरातील झाडं आणि विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. चक्रीवादळाचा विध्वंसक रुप पाहता ओडिसा सरकारकडून १८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमध्येही या तितली वादळाने धुमाकूळ घातला आहे. आंध्रप्रदेशमधील जनजीवन या वादळामुळे पूर्णत: विस्कळीत झालं आहे. दरम्यान, तितली वादळाच्या तडाख्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिसामधील रेल्वे आणि विमान वाहतुकीला या वादळचा मोठा फटका बसला आहे. विशेषत: सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची यामुळे खूपच गैरसोय होते आहे. एक नजर टाकूया रद्द करण्यात आलेल्या तसंच मार्ग बदलण्यात आलेल्या रेल्वे गांड्यावर :


तितली वादळ : ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाहाकार

‘या’ ट्रेन झाल्या रद्द

 

- Advertisement -
  • १२८६४ : यशवंतपूर हावडा एक्सप्रेस
  • १२८६४ : गुहावटी एक्सप्रेस
  • १५२७७ : मुझ्झफुर एक्सप्रेस


‘या’ ट्रेनच्या मार्गात बदल

 

  • १२५०४ : आगरतळा ते बंगळुरु कँटॉनमेंट एक्सप्रेस
  • २२८३१ : हावडा जंक्शन ते सई प्रशांथीनिलयम एक्सप्रेस

वाचा: ओडिशातील ८ जिल्ह्यांत ‘तितली’चा धुमाकूळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -