घरदेश-विदेशदाभोलकर हत्याप्रकरण : हायकोर्टाने CBI ला फटकारले

दाभोलकर हत्याप्रकरण : हायकोर्टाने CBI ला फटकारले

Subscribe

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का? बेरोजगारांना अटक करता पण पुरावे कुठे आहेत? असे प्रश्न हायकोर्टाने सीबीआयला विचारले आहेत. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे हे लाजीरवाणे असल्याचं म्हणत हायकोर्टाने सीबीआयला हटकले आहे. ‘बेरोजगारांना अटक करता, पण पुरावे कुठे आहेत? असे विचारत दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे’, असे हायकोर्टाने सीबीआयला म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्टाने सीबीआयला झापले. हायकोर्टाने  दाभोलकर हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, याकडे हायकोर्टाने लक्ष वेधले. तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का? बेरोजगारांना अटक करता पण पुरावे कुठे आहेत? असे प्रश्न हायकोर्टाने सीबीआयला विचारले आहेत.

कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या जाळ्यात दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीही अडकले.

- Advertisement -

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘मॉर्निंग वॉक’साठी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर गेले होते. पुलावर आधीपासूनच दाभोलकरांना ओळखणारे दोनजणं हजर होते. दाभोळकर निश्चित स्थळी पोहचताच त्या दोघांनी तिथे आलेल्या  शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्याकडे  ‘हेच दाभोलकर आहेत का’? अशी विचारणा केली. दाभोलकर हेच असल्याची खात्री पटल्यावर त्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे, गोळी झाडणाऱ्या दोघांच्या कटात दाभोलकरांची ओळख पटवून देणारे कळसकर आणि अंदुरे हेही सहभागी असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. दरम्यान,  हायकोर्टाने उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर सीबीआयकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार? हे येणारी वेळच सांगेल.


पाहा :  #10yearschallenge वर विनोदी मिम्सचा पाऊस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -