हरयाणात दलित तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण

म्हशींना चारावयास नेण्यास आणि शेतात काम करण्यास नकार दिल्याने एका तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरयाणा येथे घडल्याचे समोर आले आहे.

Haryana
Dalit youth stripped, beaten for refusing to work in fields in Haryana
हरयाणात दलित तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण

म्हशींना चारावयास नेण्यास आणि शेतात काम करण्यास नकार दिल्याने एक तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना हरयाणा येथे घडल्याचे समोर आले आहे. हरयाणाच्या सोनीपतमधील बजाना गावात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्याने या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

यासाठी केली मारहाण

हरयाणाच्या सोनीपतमधील बजाना गावातील मोहित आणि जितेंद्र या दोन्ही तरुणांनी दलित तरुण अंकितला शेतात काम करण्यास आणि म्हशीला चारावयास नेण्यास सांगितले. मात्र, याला अंकितने नकार दिला. नकार दिल्याने संतापलेल्या या दोन्ही तरुणांनी अंकितला गावातील शेतात नेऊन काठीने बेदम मार दिला. त्यानंतर त्याला हरयाणवी गाण्यावर नृत्यू करण्यास भाग पाडले आमि सर्व प्रकारचे चित्रीकरण करुन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. याबाबतचे वृत्ती मीडियात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मोहित आणि जितेंद्रला अटक करुन त्यांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याची दखल घेऊन आम्ही दलित तरुणाची भेट घेतली. त्यानंतर त्याची तक्रार नोंदवून आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींना रिमांडवर घेतले जाईल आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे गन्नौरचे पोलीस उपायुक्त संदीप कुमार यांनी सांगितले आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी दिला वेळ

हेही वाचा – मोदी सरकार बदलणार नाही तोपर्यंत अर्धनग्न राहणार