घरदेश-विदेशशिक्षकाने तरुणीला कपडे काढायला लावले; गुन्हा दाखल

शिक्षकाने तरुणीला कपडे काढायला लावले; गुन्हा दाखल

Subscribe

हैद्राबादमध्ये डान्स क्लासच्या एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपडे काढायचा आदेश दिला. त्यामुळे एका तरुणीने या शिक्षकाच्या विरोधात पोलिसांत धाव घेऊन शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हैद्राबादमध्ये एका डान्स क्लासच्या शिक्षकाने २१ वर्षीय तरुणीला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात त्या तरुणीने हैद्राबादच्या नारायणगुडा या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या डान्स क्लासच्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा कलम ५०९ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले पोलीस?

यासंदर्भात नारायणगुड पोलीस ठाण्याचे निरिक्षकांनी सांगितले की, ‘१५ एप्रिल रोजी एक तरुणी डान्स क्लासच्या शिक्षका विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. तिने सांगितले की त्या शिक्षकाने डान्स क्लास सुरु होण्यापूर्वी सर्वांना कपडे काढायला लावले. परंतु, तिने ही गोष्ट मानली नाही आणि सरळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी आली.’ नारायणगुडा पोलीस अधिकारी या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -