मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावू नये; देवबंदचा नवा फतवा

मुस्लिम महिलांना नखांवर नेलपॉलिश लावणे इस्लाममध्ये मान्य नाही. महिलांनी नखांवर नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदी लावावी, असं दारुल उलूमचे मुफ्ती इशरार गरुआ यांनी म्हटले आहे.

Saharanpur
nail polish
नेल पॉलिश

मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे इस्लामविरोधी असल्याचे सांगत त्याविरोधात देवबंदने फतवा काढला आहे. दारुल उलुम देवबंद या संस्थेने हा फतवा काढला आहे. वॅक्सिंग, शेव्हिंगनंतर आता देवबंदने महिलांना नेल पॉलिश लावण्यास मनाई केली आहे. मुस्लिम महिलांना नखांवर नेलपॉलिश लावणे इस्लाममध्ये मान्य नाही. महिलांनी नखांवर नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदी लावावी, असं दारुल उलूमचे मुफ्ती इशरार गरुआ यांनी म्हटले आहे.

नेल पॉलिशपेक्षा मेहंदी लावा

दारुल उलुम देवबंद ही एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेला जगभरातील मुस्लिमांच्या मनात आदर आहे. यापूर्वी देखील या संस्थेने वादग्रस्त फतवे जारी केलेले आहेत. त्यांच्या या फतव्यांवर टीकाही होतात. मुस्लिम महिलांनी मेहंदी लावण्यास विरोध करणारा फतवाही गुरुवारी जारी करण्यात आला होता. मुस्लिम महिलांनी नेल पॉलिश लावू नये. नेल पॉलिश लावणं इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे नेल पॉलिश ऐवजी नखांवर मेहंदी लावावी, असा फतवा या संस्थेने जारी केला आहे.

या फतव्यांमुळे देवबंद चर्चेत

ऑक्टोबर २०१७ मध्येही याच संस्थेने एक फतवा काढला होता ज्यानुसार मुस्लिम महिलांनी केस कापणे आणि ब्युटी पार्लरमध्ये जाणे हे इस्लामविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले होते. सोशल मीडियावर मुस्लिम स्त्रियांचे आणि पुरुषांचे फोटो पोस्ट करणं हराम असल्याचे देखील या संस्थेने म्हटले होते. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये चमकणारा बुरखा घालू नये ते इस्लाम विरोधी असल्याचा फतवा काढला होता. तसेच परपुरुषांच्या हातून बांगड्या भरण्यासही त्यांनी विरोध केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here