Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE DCGI ची मोठी घोषणा! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

DCGI ची मोठी घोषणा! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी

Related Story

- Advertisement -

सिरम संस्थेची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. DCGI ने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या मोहिमेची प्रतिक्षा संपलेली आहे. DCGI च्या घोषणेमुळे लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम संस्थेच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. या मागणीवर पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

कोविशिल्डच्या लसीला १ आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला २ जानेवारीला आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली होती. मात्र, लसीकरण सुरु करण्यासाठी DCGI ची परवानगी महत्त्वाची होती. यासाठी केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि सीरम संस्थेच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यावर आज DCGI ने पत्रकार परिषद घेत या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.

- Advertisement -

डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमानी म्हणाले की दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीतही वापरल्या जाऊ शकतात. डीसीजीआयच्या म्हणण्यानुसार दोन्ही लसींचे दोन डोस इंजेक्शन म्हणून दिले जातील. या दोन्ही लसी २ ते ८ अंश तापमानात ठेवण्यात येणार आहेत. व्हीजी सोमानी म्हणाले की केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (Central Drugs Standard Control Organisation) तज्ज्ञ समितीने १ आणि २ जानेवारी रोजी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती.

डीसीजीआयच्या म्हणण्यानुसार या एसईसीमध्ये पल्मोनोलॉजी (Pulmonology), इम्यूनोलॉजी (Immunology), मायक्रोबायोलॉजी (Microbiology), फार्माकोलॉजी (Pharmacology), पेडियाट्रिक्स (Paediatrics), अंतर्गत औषधांचे Internal medicine) डॉक्टर आणि शास्त्रज्ञ या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता.

- Advertisement -

डीसीजीआयच्या मते, सीरम इन्स्टिट्यूट लसची एकूण कार्यक्षमता ७०.४२ टक्के होती. सीरमचे आकडे इतर देशांशी मिळते जुळते आहेत. डीसीजीआयने सांगितले की सीरमद्वारे या लसीवर देशात क्लिनिकल चाचण्या सुरूच राहतील.

साइड इफेक्ट्सवर डीसीजीआय काय म्हणाले?

डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमानी म्हणाले की ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ही लस ११० टक्के सुरक्षित आहे. सुरक्षेबाबत काही चिंता असेल तर अशा कोणत्याही लसीला मंजूरी दिली जाणार नाही. व्हीजी सोमानी म्हणाले की याचे सौम्य दुष्परिणाम आहेत परंतु याबद्दल काळजी करण्याचं काहीच नाही. ते म्हणाले की, सौम्य ताप, वेदना, अॅलर्जी यासारख्या गोष्टी प्रत्येक लसमध्ये असतात.

- Advertisement -