घरदेश-विदेशमृत व्हेलच्या पोटात आढळले ४० किलो प्लास्टिक

मृत व्हेलच्या पोटात आढळले ४० किलो प्लास्टिक

Subscribe

फिलिपाइन्समध्ये एका व्हेल मास्याच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या पोटात ४० किलो प्लास्टिक आढळले आहे. प्लास्टिकमुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.

सध्या पर्यावरणाचा समतोल प्रदूषणामुळे बिघडत चालला आहे. जल प्रदूषणामुळे समुद्रातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत. शहरातील कचरा समुद्रात फेकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. याचाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. फिलिपाइन्समध्ये एका व्हेल मास्याचा प्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे. या मृत व्हेलचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या पोटातून ४० किलो प्लास्टिक काढण्यात आले. याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जलप्रदूषणामुळे पाण्यातील जीवांना धोका उदभवत असल्याचे या घटनेवरून पून्हा एकदा समोर आले आहे.


“या व्हेल मास्याचा मृतदेह पाण्यावर तंरगत असताना आम्ही बाहेर काढला. याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या पोटात अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. यामध्ये १६ भाताची पोती आणि ४ विविध शॉपिंगच्या थैल्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रणावर प्लास्टिक खाल्यामने तिला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. जलप्रदूषण करणाऱ्यांविरोधात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक आहे.” – संग्रहालयाचे अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -