जम्मू काश्मीर : उधमपूर येथे बस दरीत कोसळून ६ ठार ३८ जखमी

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे दरीत बस पडून अपघाता झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत.

Jammu-Kashmir
jammu kashmir : accident at jammu kashmir six died
उधमपूर येथे बस दरीत कोसळून ६ ठार ३८ जखमी

जम्मू काश्मीर येथील उधमपूर येथे बस अपघात झाला आहे. या बस अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. उधमपूरमध्ये शुक्रवारी रात्री बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सहा जण ठार झाले असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरिंसरहून श्रीनगर येथे ही बस प्रवास करत होती. उधमपूर येथे एका घाटातून जातेवेळी ही बस अचानक दरीत कोसळली आणि हा भयंकर अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर ३८ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींमधील एका रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here