पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक

दीपक कुलकर्णी हाँगकाँगमध्ये मेहूल चोकसीच्या डमी फर्मचा डायरेक्टर होता. सीबीआय आणि ईडीने गेल्या काही दिवसामध्ये कुलकर्णीच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.

Kolkata
Deepak Kulkarni has been arrested
दीपक कुलकर्णाला अटक

१४ हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात ईडीला यश आले आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहूल चोकसीच्या जवळचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकत्ता एअरपोर्टवरुन अटक करण्यात आली आहे. दीपक कुलकर्णी हाँगकाँगवरुन विमानाने कोलकात्याला पोहचला असता ईडीने त्यांच्यावर कारवाई करत अटक केली. दीपक कुलकर्णी हाँगकाँगमध्ये मेहूल चोकसीच्या डमी फर्मचा डायरेक्टर होता. सीबीआय आणि ईडीने गेल्या काही दिवसामध्ये कुलकर्णीच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानंतर ईडीला कुलकर्णीला पकडण्यात मंगळवारी यश आले असून त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

मेहुल चोकसीपर्यंच पोहचण्यास मदत होईल

ईडीसोबतच इतर तपास यंत्रणांना अपेक्षा आहे की, दीपक कुलकर्णीकडून पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपी मेहुल चोकसीच्यासंदर्भात महत्त्वाचे पुरावे मिळू शकतील. कुलकर्णीकडून मिळालेल्या महत्वाच्या माहितीवरुन तपास यंत्रणांना मेहुल चोकसीपर्यंत पोहचण्यास मदत होईल. याआधी सप्टेंबरमध्ये ईडीने सर्व आरोपींना खोटे आणि आधारहीन सांगितले होते. चोकसीने एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये त्याने ईडीने चूकीच्या पध्दतीने माझी संपत्ती जप्त केली असल्याचा आरोप केला होता.

नीरव मोदीने ९ याचिका केल्या दाखल

दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. ईडीने तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे. आपण फरार नाही, तसेच आपण तपासासाठी सहकार्य करत नाही, हा ईडीने केलेला दावा खोटा आहे, असे मोदी याने त्याच्या याचिकांत म्हटले आहे. न्यायालयाने सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here