आज संसदेत राजनाथ सिंह LAC वरील परिस्थिती संदर्भात बोलणार

defence minister rajnath singh statement in parliament today on india china border
आज संसदेत राजनाथ सिंह LAC वरील परिस्थिती संदर्भात बोलणार

पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील भारत आणि चीनी सैन्य यांच्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत माहिती देणार आहेत. याबाबत संसदीय सुत्रांनी माहिती दिली आहे. या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी विरोधी पक्ष मागणी करत होता. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान काल पहिल्यांच संसदेच्या अधिवेशनात एलएसीवरी घुसखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता. आज याच मुद्द्यावर राजनाथ सिंह बोलणार आहे. हे एलएसी संदर्भातले भारत सरकारचे पहिले अधिकृत वक्तव्य असेल.

काही दिवसांपूर्वीच मॉस्को येथे चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहे यांच्यासोबत राजनाथ सिंह यांची भेट झाली होती. तर त्या आधी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भेट घेतली होती. यामध्ये पाच मुद्द्यांवर सहमती मिळाली होती. दरम्यान कॅबिनेट आणि अर्थविषयक मंत्रीमंडळ समितीची आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होऊ शकते. याबाबतची माहिती देखील सरकारी सुत्रांनी दिली आहे.

पूर्व लडाखमधील एसएसी जवळ असलेल्या भागात तणाव निर्माण झाला आहे. मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच मुद्द्यांना सहमती मिळल्यानंतरही तणाव काही कमी होताना दिसत नाही आहे. मुत्सद्दी आणि सैन्य पातळीवरील उच्च स्तरावरील चर्चेतही तोडगा निघालेला दिसत नाही आहे. माहितीनुसार भारत आणि चीनचे सैन्य एलएसीवर तटस्थपणे उभे आहेत. भारतीय सैन्य चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.


हेही वाचा – बिहार निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच भाजपचे स्टार प्रचारक